“झाडे लावू , झाडे जगवू
एक माणूस -एक झाड
हरित महाराष्ट्र आपण घडवू”

 

वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय.शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे.

 

उद्देश

१) जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे.

२) जीव विविधता जपण्यासाठी.

३) कीटक, पक्षी, सरीसृप , प्राणी यांना हक्काचा अधिवास निर्माण करून देण्यासाठी.

४) जमिनीची धूप होऊ नये म्हणून.

५) पाणी अडवून जमिनीत जिरवता यावे.

६) वाळवंटीकरण रोखण्यासाठी.

7)पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *